हिंगोणा ता. यावल (प्रतिनिधी) – येथिल बाजार चौकाच्या मागच्या बाजूला मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत पाण्याचे टाकीचे काम सुरू आहे तसेच ते काम इ टेंडरच्या नियमा नुसार १८ महिन्याच्या आत पुर्ण करणे अपेक्षीत होते परंतु सदर टाकीचे बांधकामे बंद असल्याने व कासव गतीने होत असल्याने झालेल्या कामाची काळजी देखील घेतली जात नाही आहे तरी सदर काम हे गैर जबाबदारीने होत असून या कामाला पुन्हा नव्याने लवकरात लवकर सुरुवात करून पूर्ण करावे उर्वरित काम अन्य दुसऱ्या ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावे तसेच संबंधित ठेकेदाराकडून मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे त्या कामाचे व्हॅल्युएशन कमी करून सदर ठेकेदारा कडुन दंड आकारला जावा अशी तक्रार येथिल रहीवासी ज्ञानदेव भालेराव जिवन तायडे शेख शोयेब यांनी नुकतीच गटविकास अधिकारी यावल यांच्या कडे केली आहे तसेच चौकशी करुन ठेकेदार व संबधित अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.









