जामनेर शहरात भुसावळ रस्त्यावर झाली घटना
शफिक शेख (वय ३० रा. अजिंठा ता. सोयगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो भुसावळ वरून जामनेर शहराकडे दुचाकीने (एम एच ४८ बी एस २३७५)येत होता. तेव्हा भुसावळ रस्त्यावर जामनेर इथून भुसावळ कडे जाणाऱ्या डंपरने (एम एच १२ व्ही बी ८६७७) त्याला समोरून धडक दिली. या धडकेत शफिक शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामस्थांनी तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या अपघातानंतर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.