जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांच्यावर रविवारी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि राष्ट्रीय करणी सेनेचे राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीणसिंहजी पाटील यांचा रविवारी वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी “केसरीराज” चे संपादक भगवान सोनार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, राष्ट्रीय राजपूतकरणी सेनेचे प्रवक्ते डॉ. प्रा. विश्वजित सिसोदिया, भगवान खंडाळकर,विलास राजपूत,शैलेशअप्पा ठाकरे,ॲड. दीपक सपकाळे, विठ्ठलसिंह मोरे, रोहन महाजन, राहुल पाटील, आशिष राजपूत, ईश्वर जाधव, ऋषिकेश राजपूत आदी उपस्थित होते.









