छत्रपती संभाजीनगर येथील वकिलांवरील दाखल गुन्हे प्रकरण
जामनेर (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजीनगर येथील ॲड.सिध्दार्थ बनसोडे व ॲड.किशोर वैष्णव यांच्याबाबतीत सातारा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याचा निषेध म्हणुन आज जामनेर तालुका वकील संघाचे वतीने ‘पेन डाऊन’ आंदोलन करुन जामनेर चे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी या दोन वकीलांवर बेकायदेशीर गुन्हा दाखल करुन सराईत गुन्हेगारांसारखी वागणुक देऊन अपमानित केले व. समाजात बदनामी होईल असे बेकायदेशीर कृत्य केले आहे. तेव्हा पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना जामनेर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.एम.चौधरी, सचिव ॲड.महेंद्र बी.पाटील, खजिनदार ॲड.सोनाली सुरवाडे तसेच जामनेर तालुका वकील संघाचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.आज न्यायालयीन कामकाजात वकील बांधवांनी सहभागी न होता ‘पेन डाऊन’ आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त केला.