एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खेडी शिवारातील वारकरी भावनाजवळ राहणाऱ्या तरूणाचा महागडा मोबाईलची चोरी केल्याची घटना सोमवारी ६ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता समोर आली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली.
विजय श्रीराम बारेला (वय-२४, रा.भगवानपूरा जि.खरगोन, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वारकरी भावनाजवळ रणजीत कुमार सहदेव रॉय (वय-३३) हा तरुण वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तरुण हा घरात झोपलेला असताना संशयित आरोपी विजय बारेला याने घरातून मोबाईल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर रणजीत रॉय याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विजय श्रीराम बारेला यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.