जळगांव (प्रतिनिधी) :- खान्देश केटरिंग असोसिएशन, जळगांव व अन्न व औपथ प्रशासन विभाग जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव शहरातील केटरिंग सेवा पुरविणारे सर्व अन्न व्यावसायिक यांचेसाठी दि.०९ जानेवारी रोजी केमिस्ट भक्न सिंथी कॉलनी, जळगांव येथे सकाळी ११.०० वाजता पी-टेक याच्या मार्फत फॉस्टेंक प्रशिक्षण आयोजीत केलेले आहे.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने नागरिकांना सुरक्षित अन्न आणि निरोगी आहाराची उपलब्धता, वापर सुनिश्चीत करून भास्ताच्या अन्न सुरक्षा आणि पोषण परिवर्तन घडवुन आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने हा उपक्रम आहे. तरी असोसिएशनमधील सर्व सदस्य तथा जळगांव शहरातील केटरिंग सेवा पुरविणारे सर्व अत्र व्यावसायिक यांना सदरच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावे, असे सं.कृ. कांबळे, सहा. आयुक्त अत्र औषध प्रशासन, जळगांव यांनी सांगीतले आहे.