भडगाव शहरात एलसीबीची कारवाई
भडगाव (प्रतिनिधी) :- दोघे तरुणांनी दहशत माजविण्यासाठी आणलेला गावठी कट्टा सापडल्याने दोन्ही तरुणांना ताब्यात घेत मुद्देमाल जमा करत भडगाव पोलिस स्टेशनला आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक शेखर डोमाळे, पो.कॉ.ईश्वर पाटील, सागर पाटील व पथकातील कर्मचारी यांनी केली.
पो.कॉ.सागर गुलाब पाटील यांनी फिर्याद दिली. संशयित आरोपी आकाश झुंबर कांबळे (वय २४, रा. यशवंतनगर, भडगाव) आणि दुसरा संशयित आरोपी शुभम भास्कर जौणे (वय २७, रा. कजगाव ता.भडगाव) यांच्या जवळ २५ हजार रुपये किमतीची एक गावठी बानावटीची पिस्टल ३० लोखंडी मॅग्झिन असलेली समोर गोल बैरल व मुठीत बाजूस तपकिरी रंगाची प्लेट, त्यावर चांदणीची आकाराची नक्षी असलेली गावठी कट्टा आढळला.
शुभम भास्कर जौणे याने परिसरात दहशत माजवत गावठी बनावटीचे पिस्टल विना परवाना बाळगत सदरचे पिस्टल हे विना परवाना आकाश झुंबर कांबळे याला आर्थिक फायद्याकरीता विकले. याप्रकरणी दोघाविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहे.