भडगाव येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त उपक्रम
भडगाव (प्रतिनिधी) :- येथील पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात मतदारसंघाचे आ. किशोर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. आ. किशोर पाटील यांनी विजेत्या मंडळांचे अभिनंदन करून मतदारसंघात कायम एकता राहिली पाहिजे असे सांगितले.
भडगाव पोलिस स्टेशन येथे पोलिस स्थापना दिवसा निमीत्त भडगाव शहरातील उत्कृष्ठ गणेश मंडळ व ईद ए मिलाद मिरवणूक शांततेत पार पाडली म्हणून विजेत्या मंडळांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. किशोर पाटील होते. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी केलें. या वेळी बोलतांना सर्व धर्म शांततेच्या मार्गाने विविध उपक्रम राबत असतात. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नेहमी एकजुट देत राहतात, असे कौतुक निरीक्षक पवार यांनी केले.
या वेळी पहिला क्रमांक आझाद चौक मित्र मंडळ, दुसरा क्रमांक जागृती गणेश मंडळ, तिसरा क्रमांक बजरंग मित्र मंड तर ईद ए मिलाद मिरवणुकीतील जलाली मोहल्ला पंच कमिटी यांना पो. नि. पांडुरंग पवार यांनी विजेते घोषित करून आ. किशोर पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. आभार प्रदर्शन सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मस्के यांनी केले. या वेळी पोलिस उपनिरिक्षक सुशील सोनवणे, महिला दक्षता समिती, पोलीस पाटील व सर्व मंडळ पदाधिकारी हजर होते.