स्नेहसंमेलनानिमित्त विद्यालयाला दिल्या गरजू वस्तूंच्या भेटी
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डांभूर्णी येथील नवयुवक विद्या प्रसारक मंडळ संचालित डॉ. डि.के.सी. विद्यालय येथे दहावीच्या २००३-०४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी दि. २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन वाणी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक दिवाकर चौधरी हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला माजी शिक्षकांच्या वतीने चंद्रकांत नेहेते, आर. जी.नारखेडे, सुरवाडे, उमाकांत भादले, अनिल अत्तरदे यांचेसह सध्या कार्यरत शिक्षकांपैकी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत महाजन, उपशिक्षक ठाकूर, निळे, उद्धव पाटील, विवेक महाजन, चेतन सरोदे, जनार्दन दादा यांची उपस्थिती होती. स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींची भेट झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थ्यांमधील केयुर पाटील, कांचन कासार, प्रविण कोळी यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पराग फालक, मोनिका करांडे, नीता कोळी, जयंत पाटील, यामिनी सरोदे तसेच ईतर सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना भेडसावत असलेली शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर तसेच वीज गेल्यावरही चालू शकणारा ब्लू टूथ स्पीकर आणि माईकचा सेट ही शाळेला गिफ्ट केला आहे.