चंद्रकांत कोळी
रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील शेतकरी भिकन वामन बोंडे यांनी त्यांच्या अंगणात गत ११ वर्षापासून नैर्सगिकरित्या देशी जातिचे आंब्यांचे वृक्ष लावले असून यंदा डिसेंबर महिन्यातच या आम्रवृक्षाला मोहोर आल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रत्येक आम्र वृक्षाला जानेवारीदरम्यान फुलमोहोर येतो.
परंतु, या वृक्षाला डिसेंबरच्या सुरुवातीलाच फुलमोहोर आल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे हा आम्रवृक्ष लक्ष वेधून घेत आहे. गत काही वर्षापासून वा वृक्षाला एवढा मोठा फुलमोहोर आल्या नसल्याचे सांगण्यात आले. परंतु यंदा लवकर फुलमोहोर आला आहे. याबाबत भिकन बोंडे यांनी आश्चर्य व्यक्त करत त्याला दुजोरा दिला. याबाबत शेतकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त करत निसर्गाच्या लहरीपणाचे हे लक्षण असल्याचे सांगितले.