दरवर्षीप्रमाणे भाविकांचा उत्साह
जळगाव ( प्रतिनिधी ):- तालुक्यातील असोदा येथील श्री संत गजानन माऊली परिवारातर्फे बुधवार दि. १ रोजी पालखी श्री क्षेत्र शेगावकडे रवाना झाली आहे. यावेळी पादुका व पालखीचे पूजन विक्रम पाटील यांनी केले.
ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. पायी वारीमध्ये गणेश वानखेडे, गिरीश वानखेडे, समाधान चौधरी, धनंजय वानखेडे, शुभम सोनार, प्रकाश डोळसे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.