मुक्ताईनगर निमखेडी खुर्द गावातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : – घरात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले २ लाख १९ हजार ८४४ रूपयांचे सोन्याचे दागिने बंद घर फोडून चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुधाकर त्र्यंबक डहाके (वय ५९) हे परिवारासह वास्तव्याला आहे. मुलाच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. दरम्यान दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना संशयित आरोपी भावेश मराठे याने बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटातून २ लाख १९ हजार ८४४ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर सुधाकर डहाके यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीसात संशयित आरोपी भावेश मंगेश मराठे (रा. निमखेडी खुर्द ता. मुक्ताईनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहे.









