जळगाव जिल्ह्यात शोककळा
पारोळा (प्रतिनिधी) :- सैन्यदलात सेवा बजावत असलेल्या ४० वर्षीय पारोळा तालुक्यातील करमाड येथील जवानाचा भोपाळ येथे मृत्यू झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नवनीत हिम्मत पाटील (४०, करमाड ता. पारोळा) असे या जवानाचे नाव आहे. गेल्या २२ वर्षापासून ते सैन्यात सेवा बजावत होते. सध्या भोपाळ येथील कॅम्पमध्ये ते हवालदार म्हणून कार्यरत होते. १०५ रेजिमेंटच्या बटालियनमध्ये सेवा बजावत होते. दि. २७ रोजी सायंकाळी मोटर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी मोटर काढण्याचा हुक सटकल्याने तो त्यांच्या डोक्याला लागून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे पार्थिव आज रविवार दि. २९ रोजी आणले जात आहे.