जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी
फिर्यादी राजेंद्र गुलाबराव गरुड यांना १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या काळात राहुल गुप्ता व त्यांचे असिस्टंट संदीप राव यांनी राजेंद्र गरुड यांना व्हाट्सअप नंबर वर संपर्क करून मनी लॉन्ड्रीगमध्ये तुमचे सिम कार्ड, पॅन कार्ड व आधार कार्ड वापरण्यात आलेले आहे. याच्याविरुद्ध मुंबई क्राईम ब्रँच येथे गुन्हा नोंद झालेला आहे. डिजिटल अरेस्ट करून वारंवार धमकी देऊन खोटी कोर्टाची ऑर्डर व इतर कागदपत्रे व्हाट्सअप वर पाठवले व त्यांना पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून ऑनलाईन १८ लाख रुपये घेतले व त्यांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी जळगाव सायबर सेलला गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे, हेमंत मांडलिक, सचिन सोनवणे यांनी बँक खात्यामध्ये भरलेले पैसे व त्याची माहिती काढून हे बँक खाते जालिंदर, पंजाब राज्यामध्ये असल्याची माहिती झाल्याने हे खाते गोठवून १७ लाख रुपये न्यायालयाच्या आदेशाने परत संजय गरुड यांच्या बँक खात्यात वर्ग केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, कोणताही अनोळखी व्हिडिओ कॉल आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. मुळात डिजिटल अरेस्ट हा प्रकार कुठेच नाही. शेअर मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवणूक करताना खात्रीपूर्वक करावी. कुरिअर पार्सलच्या नावाने कोणीही ओटीपी मागत असेल तर देऊ नये कोणालाही फोन द्वारे स्वतःची बँक आहे. त्याच्या वैयक्तिक माहिती सांगू नये कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर ऑनलाईन व्यवहार करताना खात्री करूनच करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.