मेहुणबारे पोलीस स्टेशनची कारवाई, ८४ हजारांची रोकड जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथून दोन ठिकाणी एकूण १६ बकऱ्या चोरीस गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. तपासामध्ये बकऱ्या खरेदी करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यक्तीला मिळून मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे तर चोरी करणाऱ्याचा शोध सुरू आहे.
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील भाऊसाहेब युवराज पवार यांच्या ५३ हजार रुपये किमतीच्या ५ बकऱ्या १२ डिसेंबर रोजी तर १३ डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी खडकीसिम येथील रहिवासी प्रवीण तुळशीराम पाटील यांच्या ८९ हजार रुपये किमतीच्या ११ बकऱ्या अज्ञात चोरट्याने करून दिलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. (केसीएन)सदर गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांनी तपास केला असता मुख्य संशयित आरोपीचे नाव निष्पन्न झाले. मात्र त्याच्याकडून बकऱ्या विकत घेणारा संशयित आरोपी हुसेन समशुभाई खाटीक (रा. हांडेवाडा फाटा, ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तपास केला असता चोरीच्या असल्याची माहिती असतानाही त्याने बकऱ्या कमी किमतीमध्ये चोरी केल्याची त्याने कबुली दिली आहे. यातील ८४ हजार रुपये रक्कम गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आली आहे. मुख्य संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. (केसीएन) सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सपोनि प्रवीण दातरे, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हेड कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, सचिन निकम, शांताराम पवार, कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी केली आहे.