बोदवड तालुक्यातील येवती परिसरातील घटना
बोदवड (प्रतिनिधी) :- तालुक्यातील येवती शिवारातून चोरट्यांनी वीजपंपासह केबल चोरून नेली. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुरट्या चोरट्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
येवती शिवारातील गट क्रमांक ११६/२ महेश सुरेश अहिर या शेतकऱ्याच्या शेतात विहिरीत सोडलेली पाणबुडी मोटार तसेच ५० मीटर केबल व स्टार्टरसह पेटी असे एकूण १० हजार रुपयांचे साहित्य चोरी करून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. शेतकरी महेश अहिर शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता हा प्रकार निदर्शनास आला. महेश अहिर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.