जिल्हापेठ पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडून आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून याप्रकरणी ६ संशयित आरोपीना अटक करून त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त केल्या आहेत.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन (रा. धानोरा) याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट, अविनाश सुनील पाथरवट (दोन्ही रा. वाघळूद), शाहरुख रमतुल्ला खाटीक (रा. लक्ष्मीनगर, जळगाव), सुरेश उत्तम मोरे (रा. वाघळूद) यांच्यासह विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता, त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून, २ रावेर येथे आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील साहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण, महिला हवालदार भारती देशमुख, राजेश पदमर, मिलिंद सोनवणे, राहुल पाटील, अमितकुमार मराठे, प्रशांत सैंदाणे, नरेंद्र दिवेकर, प्रवीण जाधव, विकास पहरकर यांनी ही कामगिरी बजावली.