• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

संकटकाळात गोरगरिबांना मदत करण्यात केंद्र सरकार अपयशी-जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

स्पिक अप इंडिया उपक्रमातून तात्काळ मदत करण्याची जिल्हा एनएसयुआय ची केंद्राकडे मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2020
in जळगाव
0


जिल्ह्यातून प्रदेश उपाध्यक्ष मा खा डाॅ उल्हास पाटील, प्रदेश सचिव डी जी पाटील ,आ. शिरीष चौधरी,ॲड संदिप पाटील , एन एस यु आय जिल्हाधक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह हजारो काॅंग्रेस पदाधिकार्यांनी घेतला स्पिक अप इंडिया उपक्रमांत सहभाग

जळगांव ( प्रतिनिधी) – कोरोनामुळे हतबल झालेल्या देशातील कोट्यवधी नागरिकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने #SpeakUPIndia अभियान राबवले आहे. जळगाव जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा एनएसयुआय चे जिल्हाध्यक्ष् देवेंद्र मराठे यांनीया अभियानात सहभागी होत ,केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी विनंती केली आहे.

केंद्राकडून भरीव मदत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचं, निराशेचं वातावरण आहे. त्यांना आधार देण्यासाठी, देशाची अर्थव्यवस्था लवकरात लवकर रूळावर आणण्यासाठी मा. काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि मा. राहुल गांधीजी यांनी काही सूचना मांडल्या आहेत.

सर्व गरिबातील गरीब कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकरकमी १० हजार रूपये जमा करावेत. तसेच कॉंग्रेस पक्षाने सुचवलेल्या ‘न्याय’ योजनेनुसार पुढील सहा महिने त्यांच्या खात्यात दरमहा ७ हजार ५०० रूपये जमा करावेत, अशी प्रत्येक गरीब कुटुंबाची मागणी आहे.
थेट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली तर देशातील कोट्यवधी नागरिकांच्या हाती पैसा येऊन त्यांना दिलासा तर मिळेलच; शिवाय लोकांच्या हाती पैसा उपलब्ध झाल्याने बाजारातील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होण्यास मदत होईल.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज विविध राज्यांमधून कष्टकरी, मजूर आपआपल्या मूळ राज्यात जात आहेत. त्यांच्या प्रवासाचा आणि खाण्यापिण्याचा सर्व खर्च सरकारच्या स्तरावर झाला पाहिजे. ते गावात गेल्यानंतर त्यांना वर्षातून २०० दिवस रोजगार मिळावा, यादृष्टीने नियोजन केले पाहिजे.

केंद्र सरकारने आपल्या आर्थिक पॅकेजमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्जे देण्याच्या घोषणा केल्या आहेत. पण ही वेळ केवळ कर्जाची उपलब्धता करून देण्याची नाही, तर या उद्योगांना थेट आर्थिक मदत देण्याची आहे. त्याशिवाय त्यांना खऱ्या अर्थाने तातडीने उभारी मिळणार नाही.

शेतकरी, कर्मचारी, कामगार, व्यापारी, उद्योजक आदी सर्व घटकांच्या कर्जाचे हप्ते रिझर्व्ह बॅंकेने पुढे ढकलले आहेत. पण ते पुरेसे नाही. त्यांना भरीव मदत म्हणून सरकारने बॅंकांशी चर्चा करून कर्जखात्यांचे विशिष्ट कालावधीचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारने अशी भरीव पावले उचलली तरच या सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने मदत होणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त करून देण्यास हातभार लागेल. #SpeakUpIndia मोहिमेअंतर्गत देशभरातून केल्या जाणाऱ्या या मागण्या केंद्र सरकारने तातडीने मान्य कराव्यात, ही विनंती.


 

 

Previous Post

फक्त 120 मिनीटांमध्ये 2 लाख लोकांनी दारू घेण्यासाठी हे अ‍ॅप डाउनलोड

Next Post

राष्ट्रवादी रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे यांच्या हस्ते कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे मोफत वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे यांच्या हस्ते कोरोना रोगप्रतिबंधात्मक औषधीचे मोफत वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
1xbet russia

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
1xbet russia

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 14, 2026
भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

भडगाव पोलिसांची मोठी कारवाई! सोलर कॉपर वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; ५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

अमळनेर तालुक्यात खळबळ: पैशांचे आमिष दाखवून विवाहितेचे अपहरण व अत्याचार; आरोपीला अटक

July 15, 2026
शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शिरसोलीत २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

July 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon