पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : खेडीढोक, ता. पारोळा येथील १९ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हितेश विजयसिंग पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भानुदास पंडित पाटील (४१, खेडीढोक) यांनी याबाबत पारोळा पोलिसात खबर दिली आहे. हितेश विजयसिंग पाटील याने त्याच्या खेडीढोक शिवारातील शेतात विष प्राशन केले. ग्रामस्थांना कळताच त्यांनी हितेश पाटील यास अमळनेर येथे दाखल केले. मात्र त्याची तब्येत खालावल्याने त्याला कुटीर रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
हितेश याला कुटीर रुग्णालयात दाखल केले असता शनिवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी परिवाराने शोक व्यक्त केला. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ. कैलास साळुंखे करीत आहेत