भुसावळ तालुक्यातील दिपनगर उड्डाणपुलावरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- मलकापूर येथून धरणगावला जाण्यासाठी निघालेल्या रिक्षाला दीपनगर उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील ६२ वर्षीय वृद्ध हे ठार झाले तर रिक्षा चालकासह पती-पत्नी हे जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. याबाबत ट्रकवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश बुद्ध सारसर (वय-६२, रा. उमाळी ता. मलकापूर जि. बुलढाणा) असे मयत वृद्धाचे नाव आहे. त्यांचे जावई लखन गोविंदा पटोने (वय-३५, रा. रामदेव बाबा नगर, धरणगाव) हे पत्नी अंजली लखन पटोने यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. लखन यांची पत्नी अंजली या माहेरी उमाळी ता. मलकापूर येथे गेलेल्या होत्या. त्यांना घेण्यासाठी लखन पटोने देखील गेले होते.(केसीएन)तेथून परत धरणगाव येथे येण्यासाठी लखन पटोने पत्नी अंजली आणि सासरे रमेश बुध्द सारसर यांच्यासोबत रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीएफ ५६६)ने निघाले. दीपनगरकडून भुसावळकडे येत असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एमएच १९ सीवाय ७८३३) ने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
या अपघातात रमेश सारसर यांचा मृत्यू झाला तर लखन पटोने व त्यांची पत्नी अंजली पटोने हे दोघे जखमी झाले.(केसीएन)दरम्यान, या घटनेबाबत लखन पटोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.