आमदार राजूमामा भोळे यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- संतांनी समाजाला किर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक शिकवण देण्याचे अनमोल काम केले. त्यांचे विचार सोबत घेऊन आपण प्रगतीची वाटचाल करू शकतो असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.
भाजपा कार्यालय येथे संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, महेश जोशी, माजी महापौर सीमाभोळे, भारती सोनवणे, सदाशिव ढेकळे, कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, मुकुंद मेटकर, रेखाताई वर्मा, राजेंद्र घुगे पाटील, भगत बालानी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, मंडलाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.