लवकर बरे वाटावे यासाठी “लाडक्या बहिणीं”ची राज्यभरात प्रार्थना
मुंबई (वृत्तसेवा) :- एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याकरिता मुंबईत त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सतत येत असणाऱ्या तापामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंना अँटीबायोटिक औषधे सुरु आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.