मुक्ताईनगर शहरातील तिरंगा हॉटेल जवळील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुंड व पिंप्रीआकाराऊत फाट्याजवळील तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील तिरंगा हॉटेलजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंपळगावदेवी येथील अनिल सुनील एकनार यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी दि.३० नोव्हेंबर रोजी रात्री ८.४५ ते ९: १५ वाजेच्या दरम्यान सुनील पुंडलिक मोरे (वय ३५ वर्षे, रा. पिंपळगाव देवी, ता. मोताळा जि बुलढाणा) हे त्यांच्या ताब्यातील मोटर सायकल क्रमांक (एम.एच.२८ बि.डी.३४५९) या वाहनाने मलकापूरकडून मुक्ताईनगरकडे येत होते.
यावेळेस अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या मोटर सायकलला मागून जोरदार धडक दिल्याने त्या धडकेत सुनील पुंडलिक मोरे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. यामुळे अज्ञात वाहन चालकाच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय पवार हे करीत आहेत.