जळगाव:- येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.
आज, २८ नोव्हेंबर २०२४ रोजी, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणा कार्यावर विचारमंथन केले.महात्मा जोतिबा फुले यांनी महिलांचे आणि मुलींचे शिक्षण, शेती सुधारणा, जातिव्यवस्थेचे उच्चाटन, तसेच विधवा आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठी केलेले कार्य यावर विशेष चर्चा झाली. त्यांचे विचार आणि योगदान आजच्या सामाजिक प्रगतीसाठी प्रेरणादायी आहेत.संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहण्याचा संदेश दिला.