जळगाव शहरातील मेहरूण तलावजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मेहरूण तलाव येथील गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २५ रोजी मध्यरात्री साडे अकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणाने आत्महत्या केली किंवा तो कसा पडला याबाबत पोलीस करीत आहे.
अश्विन दीपक चौरसिया (वय ३६, रा. गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंट, मेहरूण, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होता.(केसीएन)याच अपार्टमेन्टला अश्विनचे २ शालकदेखील राहतात, अशी माहिती नातेवाइकांनि दिली. सोमवारी दि. २५ रोजी रात्री ९ वाजता बळीराम पेठ येथे वडिलांच्या घरून पार्सल घेऊन त्याच्या घरी गोल्डन ब्रिक्स अपार्टमेंट येथे आला. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास अश्विनचा लहान भाऊ अक्षय याला अश्विनच्या शालकाच्या पत्नीने फोन करून, अश्विनने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून घेतली आहे, तुम्ही सिव्हिलला जा असा निरोप आला.
त्यानंतर कुटुंबीय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अश्विनला तपासून मयत घोषित केले होते.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर घटनेत अश्विन चौरसिया हा कसा पडला ? कि त्याने आत्महत्या केली ? याबाबत एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.