जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात चौकाचौकात प्रचंड जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना सतराव्या फेरी अखेर १ लाख ४० हजार ३६४ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी ५९ हजार ३८ मते घेतली आहेत. त्यामुळे सध्या ८१ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे ६६०७, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले ३६३८, कुलभूषण पाटील २८८०, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना १ हजार ३१४, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना १९२७, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना ७९४ मते मिळाले आहेत.