जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात प्रचंड जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना चौदाव्या फेरी अखेर १ लाख १६ हजार ५२८ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी ४८ हजार ८५९ मते घेतली आहेत. त्यामुळे सध्या ६८ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे ५८६४, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले २६८६, कुलभूषण पाटील २७३१, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना १ हजार ८६, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना १६०९, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना ६४१ मते मिळाले आहेत.