अमळनेर (प्रतिनिधी) :- अमळनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास हे १ लाख ७ हजार ७५३ मते घेऊन २४ व्या फेरीअखेर आघाडीवर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना ७५ हजार ५७८ मते पडली आहे.
काँग्रेस पक्षाचे अनिल शिंदे यांचा दारुण पराभव होत आहे. या मतदारसंघात मंत्री असलेले अनिल पाटील यांचा पुन्हा एकदा निवडणुकीत प्रभाव पडलेला दिसून आलेला आहे. तसेच महाविकास आघाडीचा पराभव हा चिंतन करणारा ठरणार आहे.