जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात प्रचंड जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना अकराव्या फेरी अखेर ९५ हजार ५८१ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी ३५ हजार ८१७ मते घेतली आहेत. त्यामुळे सध्या ६० हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे ५०७१, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले २४७९, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना १२०५, कुलभूषण पाटील २५३७, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना ८७७, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना ५४७ मते मिळाले आहेत.