तालुक्यात प्रचार थंडावला
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी गावातील विकासकामांवर ग्रामस्थांशी चर्चा करत, आगामी काळातील योजना आणि प्रकल्पांची माहिती दिली. गावात झालेल्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नार – पार- गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी महायुती सरकारने ७ हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. याचा आनंद परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गिरणा व मन्याड नदीजोड प्रकल्पासाठीचा सर्वे पहिल्यांदा करण्यात आला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मन्याड धरणावरून निघणाऱ्या पाटचाऱ्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. उमेदवाराने शिरसगाव, सायगाव, तळोंदा, काकळने, नांद्रे या गावातील नागरिकांशी संवाद साधला.