पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीला विजयी करण्याचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा-भडगाव मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर शिवसेना- महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांचा विजय निश्चित असून, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी रान पेटविले आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष मधुकर काटे व विधानसभा संयोजक अमोल पाटील यांनी सांगितले.
पाचोरा-भडगाव तालुक्यात आ. किशोर पाटील यांनी सुमारे तीन हजार कोटींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. प्रत्येक गावात त्यांनी विकासकामे केली आहेत. पाचोरा व भडगाव शहराचे रूपच बदलविण्याचे काम त्यांनी केले आहे. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहर…