• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदारसंघात केली ३ हजार कोटींची कामे : आमदार किशोर पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2024
in Uncategorized, खान्देश, जळगाव
0
मतदारसंघात केली ३ हजार कोटींची कामे : आमदार किशोर पाटील

Oplus_131072


बेरोजगारांच्या हाताला काम देण्यावर राहणार भर

पाचोरा (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांत विशेषतः या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा- भडगाव मतदारसंघात तब्बल तीन हजार कोटींची कामे केली. पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदीवरील बंधारे, मंजूर एमआयडीसी व सूतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यावर भर राहीन, असे महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी संवादात सांगितले. पुढच्या पाच वर्षांत राज्यात ‘पाचोरा-भडगाव पॅटर्न’ नावाजेल, हा माझा शब्द आहे, असे त्यांनी नमूद केले.जनतेने माझ्यावर सलग दोन टर्म विश्वास दाखवत मला विधानसभेत पाठविले. मी जनतेच्या विश्वासाला पात्र

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241117-WA0071.mp4

ठरल्याने शंभर टक्के तिसऱ्यांदा मला जनता विधानसभेत पाठवेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. पाचोऱ्यात भूमिगत गटार, रस्ता काँक्रिटीकरण, व्यापारी संकुले, भाजी मंडई, हिवरा नदीवर पूल, वाचनालय, व्यापारी भवन, क्रीडा संकुल, जनता वसाहत भागातील बौद्धविहारात सभामंडप, पेव्हर ब्लॉक यांसह इतर मागासवर्गीय वस्तीतही कामे केली. प्राचीन प्रभू श्रीराम मंदिर परिसराचा विकास, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महाराणा प्रताप चौक ते रेल्वे उड्डाणपुलापर्यंत सुशोभिकरण, तसेच भडगावसाठी १३३ कोटींची पाणीपुरवठा योजना, ८२ कोटींची भूमिगत गटार योजना, तळणी व श्री स्वामी समर्थ मंदिराचे काम, तर १७० कोटींचा रस्ता काँक्रिटीकरणासह मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन पुढच्या टप्प्यात भडगाव शहात छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच पाचोरा शहरात महात्मा फुले, छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे उभारणे, पाचोऱ्यात नाट्यगृह, इगतपुरीच्या धर्तीवर विपश्यना केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भडगावातील रस्त्यांच्या १७० डीपीआरला मंजुरी मिळवण्याचे आणि विविध कामांचे स्वप्न बाळगले आहे, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

डीपीआर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक गावात शिवस्मारक, वीर एकलव्य स्मारक, पाणीपुरवठा योजना, याशिवाय गडद, अग्नावती, तितूर या नद्यांसह छोट्या नदी नाल्यांवर बंधारे बांधून शेती समृद्ध केली. गिरणा नदीवर सात ठिकाणी पूल बांधले. पहूर ते पाचोरा रस्त्यासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केले. याशिवाय ३८० किलोमीटरचे शेत पाणंद रस्ते मंजूर केले आहेत. शासनाने चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय मंजूर केले.

मात्र, अशाही परिस्थितीत जिल्ह्यातील तिसरे आरटीओ कार्यालय निर्माण करून भडगावची ओळख देशभर नेण्याचे काम केले. नगरदेवळा सूतगिरणीजवळ एमआयडीसी मंजूर करून घेतली. त्यासाठी अडीचशे हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली. पाचोरा व भडगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळवून घेतली. त्यात पाचोरा येथील इमारतीचे काम अंतिम टप्प्यात, तर भडगाव येथील जागा निश्चितीचे काम सुरू आहे. यामुळे जनता मला विजयी करून पुन्हा सेवेची संधी देईल, असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला.


 

 

Previous Post

धक्कादायक जळगाव शहरात उमेदवाराच्या घरावर गोळीबार

Next Post

आ. मंगेश चव्हाण यांना मतदारांचे पाठबळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगावात एकच चित्र ,मंगेशदादा हेच खरे भूमिपुत्र

आ. मंगेश चव्हाण यांना मतदारांचे पाठबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon