• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक जळगाव शहरात उमेदवाराच्या घरावर गोळीबार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2024
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक जळगाव शहरात उमेदवाराच्या घरावर गोळीबार

Oplus_131072


पोलीस अधीक्षकांसह पोलीस दल घटनास्थळी कारण अस्पष्ट

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तांबापुरा परिसरातील शेरा चौक येथे विधानसभा निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर २ राऊंड फायर करून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एलसीबी व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0010.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0022.mp4

अहमद हुसेन शेख (वय ५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) हे सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.(केसीएन)एमआयएम पक्षाचे ते पूर्वी माजी जिल्हाध्यक्ष होते. परिवारासह ते शेरा चौकात राहतात. शिक्षक म्हणून शिक्षण सेवा करीत परिवाराचा उदरनिर्वाह ते करीत आहेत. दरम्यान, सोमवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे शेरा चौकातील नागरिक साखर झोपेत असताना पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात २ दुचाकीस्वारांनी येऊन त्यांच्या घरावर २ राऊंड फायर केले. यात त्यांच्या घराच्या खिडकीचा काच फुटला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0017.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0011.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0012.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0006.mp4

घटनेची माहिती कळताच कुटुंबीय खडबडून जागे झाले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला ही घटना कळवली. नागरिकांना घटना कळताच अहमद शेख यांच्या घराजवळ गर्दी केली.(केसीएन)दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशन निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असता त्यात घटना कैद झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान हल्लेखोरांची माहिती काढून त्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0015.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241118-WA0016.mp4

याबाबत फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रारदार गेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली. दरम्यान, अहमद शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सकाळी गाढ झोपेत असताना अचानक काहीतरी फुटल्याचा आवाज आला. (केसीएन)थोड्यावेळाने पाहिले तर खिडकीचा काच तुटलेला दिसला आणि एक गोळी दिसली. आणखी एक गोळी पोलीस शोधण्याचे काम करीत आहे. घटनेमागे नेमके काय कारण असू शकते हे निश्चित सांगता येत नाही. मात्र मी आज शेवटच्या दिवशी प्रचार सुरूच ठेवणार असल्याचे अहमद शेख यांनी शेवटी सांगितले.

दरम्यान मुक्ताईनगर बोदवड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोदवड येथे एका प्रचार रॅली दरम्यान काही तरुणांनी गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता हा दुसरा प्रकार जिल्ह्यात घडला आहे.

 


 

 

Previous Post

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

Next Post

मतदारसंघात केली ३ हजार कोटींची कामे : आमदार किशोर पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मतदारसंघात केली ३ हजार कोटींची कामे : आमदार किशोर पाटील

मतदारसंघात केली ३ हजार कोटींची कामे : आमदार किशोर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon