जळगाव ;-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५०० पार झालेली आहे.त्याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना ज्याठिकाणी ठेवले आहे,त्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.या सर्व गंभीर प्रकाराकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे जिवंत चित्र पहावयास मिळत आहे.
याबाबत सविस्तर असे की,भुसावळ येथिल ६० वर्षीय महीला दि २२ रोजी थकवा,ताप,गळ्यात त्रास जाणवल्याने त्यांना भुसावळ वरुन जळगाव येथे आणण्यात आले.याच महीलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहीती मिळताच त्यांना याच रुग्णालयात अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.पण,ह्या रुग्णांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही,जेवण,चहा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार यावेळी त्यांनी फोनवरुन केली.सध्या या महीलेचा मुलगा आपल्या आईच्या संपर्कात आल्याने त्यांस भुसावळ येथे कॉरंटाईन करण्यात आले आहे.
मुलगा एकीकरण व आई एकीकडे अशी ताटातुट झालेली आहे.एकटा मुलगा असल्याने तो स्वतः कॉरंटाईन असल्याने लक्ष देऊ शकत नाही.पण जिल्हा शासकीय रुग्णालयाने येथे लक्ष देणे आवश्यक होते.पण तसे काही झालेले नाही.सदर बाब अतिशय निंदणीय असुन गंभीर आहे.तरी या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाने,अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी झालेली आहे.
हे.







