चाळीसगाव शहरातील भोई गल्ली येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- मतदार यादी पडताळणी दरम्यान काही इसमांनी तरुणांना मारहाण करून पिस्तूल दाखवत जीवे ठार मारण्याचे धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
शहरात भोई गल्ली घाटरोड परिसरात मतदार यादी पडताळणीचे काम सुरू होते. जय दिलीप चौधरी, निखील पवार व विष्णु चौधरी हे मतदार यादी पडताळणी करीत असताना दरम्यान किरण घोरपडे अन्य दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांच्यात बाचीबाची होउन किरण घोरपडे व अनोळखी व्यक्तींनी जय दिलीप चौधरी, निखील पवार व विष्णु चौधरी यांना मारहाण केली. तसेच जय दिलीप चौधरी, याचे नातेवाईक तेथे आले असता किरण घोरपडे याने खिशातून पिस्तूलने गोळी झाडण्याची धमकी दिली. दरम्यान, धक्काबुक्कीत पिस्तूल खाली पडले व अंधाराचा फायदा घेत संशयित व दोन अनोळखी व्यक्ती तेथून पसार झाले.
यावरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात संशयित किरण घोरपडे अन्य दोन साथीदारांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पिस्तूल व जीवंत काडतूस पोलीसांकडून जप्त करण्यात आले आहे. फरार संशयितांनाचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश सायकर करीत आहेत.