जळगाव शहरातील भोईटे नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील भोईटे नगरात घराकडे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पसार झाल्याची घटना बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भोईटे नगरात विजया किरण बोरसे (वय ४९) या बुधवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता भोईटे नगरात पायी जात असतांना एका अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेत ३५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र जबरी हिसकावून चोरून नेले. यावेळी त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. याबाबत महिलेने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख हे करीत आहे.