चाळीसगाव तालुक्यातील दडपिंप्री येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दडपिंप्री येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


शिवाजी नारायण साळुंखे असे मयताचे नाव आहे. दडपिंप्री गावात परिवारासह ते राहत होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून घरची परिस्थितीदेखील बेताची आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील पिकांची पूर्ण वाताहत झाली. त्यांनी फायनान्स कंपनी तसेच बचत गटाकडून चार लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले होते. त्यामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी विष प्राशन केले. त्यांना रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले.









