अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- पायाच्या पंजावरून डंपरचे चाक गेल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी मंगलमूर्ती चौकात घडली. अमळनेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.
अनिकेत पिसे (रा.आर. के. नगर, अमळनेर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तो पत्नीसह दुचाकीवरून जात असताना अचानक मोठ्या डंपरजवळ त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला व डंपरचे एक चाक त्याच्या पंजावरून गेले. यामुळे तो जखमी झाला. त्यास इतरांनी उचलून तत्काळ अमळनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.