जामनेर येथील स्त्री भ्रूणहत्या कार्यशाळेत अधिकाऱ्यांची माहिती
जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात कोठेही गर्भलिंगनिदान केले जात असतील तर त्याची माहिती द्या अन १ लाख रुपये बक्षीस घ्या अशी माहिती येथील पंचायत समितीच्या सभागृहात कायदेशीर सल्लागार ऍड. शुभांगी चौधरी यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृह जामनेर येथे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यासाठी स्त्री भ्रूणहत्येविषयी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस पी.सी.पी.एन.डी. टी. च्या सदस्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.नम्रता अच्छा व कायदेशीर सल्लागार ऍड.शुभांगी चौधरी या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, आशा कुयटे यांची उपस्थिती होती. रविंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर गटप्रवर्तक नीलिमा गवळी यांनी आभार मानले.
गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्राविषयी,डॉक्टर विषयी किंवा व्यक्तीविषयी माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस असून माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाते आपण तक्रार १८००२३३४४७५ किंवा www.amchimulgi.gov.in वर करू शकतात अशी माहिती चौधरी यांनी दिली.डॉ.अच्छा यांनी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे समुपदेशन करून स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याविषयी विविध चित्रफिती दाखवण्यात आल्या तसेच स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याबाबत शपथ घेण्यात आली.