जळगाव शहरातील अजिंठा चौकातील पहाटेची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अजिंठा चौकात बुधवारी दिनांक ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या अपघातात महिलेच्या पतीला जबर दुखापत झाली आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता सुनील राणे (वय ५२, रा.सतगुरुनगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या रिंगरोड भागातील घराचे काम सुरु आहे. त्याठिकाणी काम करणाऱ्यांना मजुरांना पाण्याची गरज भासते. रिंगरोड परिसरात बुधवारी सकाळी पाणी पुरवठा झाल्यामुळे, पहाटे ३ वाजता पाणी भरण्यासाठी राणे दांम्पत्य भल्या पहाटे रिंगरोडकडे जायला निघाले होते. (केसीएन)मात्र, वाटेतच ही दुर्दैवी घटना घडली. अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे. अनिता राणे या बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पती सुनील बाबुराव राणे यांच्यासोबत सतगुरु नगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरायला जात होते.
त्याचवेळी अजिंठा चौकात आले असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राणे दांम्पत्य दुर फेकले केले. त्यात अनिता राणे यांचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती सुनील राणे यांनाही मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कोणीही नव्हते.
त्यामुळे दांम्पत्याला उडविणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. (केसीएन)एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.