नागपूर येथील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी) : येथील व्यापाऱ्याची १२ लाख ७१ हजारात फसवणूक करण्यात आली आहे. यात नागपूर येथील दोन जणांविरुद्ध बुधवारी रात्री जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार सुनील विठ्ठल पाटील (४९, रा. जामनेर) यांचा जामनेर येथील औद्योगिक वसाहतीत फर्म आहे. कारखान्यांना लागणारे जळाऊ इंधन विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. प्रल्हाद लक्ष्मण मारसकोळे व वैभव जपूरकर (दोन्ही रा. नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांना सुनील पाटील यांनी फेब्रुवारीचया १० ते २६ तारखेदरम्यान जळाऊ इंधन व मक्याची सुकी कणसे पुरवली. याची किंमत १२ लाख ७१ हजार रुपये होती.
नंतर पुरवलेल्या मालाच्या रकमेची वेळोवेळी मागणी करूनही पैसे संशयित आरोपींनी दिले नाही म्हणून संबंधित संशयितांविरुद्ध सुनील पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहिता कलम ३४ व ४२० नुसार जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.