चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती भागातील घटना, गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील बस स्टॅण्डच्या पाठीमागे राहणारा २० वर्षीय तरुण हा गावठी कट्ट्याशी आरशा समोर खेळत असताना, चुकून गोळी झाडली गेली आणि ती त्यांच्या थेट गालात घुसली आहे. हि घटना दि. ४ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली, त्याला तत्काळ रुग्ण्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या शरीरात होती. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंजितसिंग हा त्याची आई व बहीणीसह बस स्टॅण्डच्या पाठीमागे भाड्याने राहतो. शुक्रवारी सकाळी मंजितसिंग हा त्याच्या हातातील बंदुक ही आरशात बघुन वेगवेगळ्या स्टाईलने हवेत फिरवित होता. त्यावेळी त्याने सदर बंदुकीस वरच्या बाजुस पकडुन मागे पुढे केले. (केसीएन)त्यावेळी मित्राने त्याला विचारले कि, मंजित तु काय करित आहे. हि बंदुक तु कुठून आणली, असे विचारले असता, त्याने त्याच्या हातातील बंदुक मित्राच्या दिशेने रोखली. तेव्हा तो घाबरून बाहेर निघुन गेला.
त्याच वेळी घरातून जोरात फटाका फुटल्यासारखा आला. तेव्हा मित्र व वडील हे घरात पळत गेले असता, मंजितसिंग हा आरशा समोर गुडघे जमिनीवर टेकून डाव्या गालाला हात लावून खाली बसलेला होता. तसेच डाव्या गालातून रक्त येत होते. मित्राने लागलीच त्याच्या आई व बहीणीस बोलावुन घेतले व त्यांना झालेला प्रकार सांगितला.(केसीएन)सर्वांनी त्यास मोटर सायकलवर बसवुन देवरे हॉस्पिटल येथे उपचाराकामी घेवुन गेले. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी रुग्णलयात धाव घेवून घटनेची माहिती घेतली.
याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला पो. उपनिरिक्षक कैलास राजधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. योगेश माळी करीत आहेत. दरम्यान मंजित याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस दलाकडून मिळाली