चेतना व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम
चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते आणि सहकारी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी यावेळी संकल्प केला. गावागावात जाऊन तरुणांशी सुसंवाद करून, हितगुज साधून व्यसनमुक्ती पर मार्गदर्शन देऊन महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला आपण व्यसना पासून दूर करू. जर का आपल्या महाराष्ट्राला व्यसनमुक्त करायचे असेल तर तरुण पिढी ही व्यसनमुक्त असली पाहिजे. व्यसनांपासून दूर राहिली पाहिजे. या संकल्पाद्वारे विद्यार्थी आणि चेतना व्यसनमुक्तीची टीम ही गावोगावी जाऊन व्यसनमुक्तीपर मार्गदर्शन करणार आहे.
तसेच पथनाट्याचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. जर का तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये व्यसनांबाबत चीड निर्माण झाली तर ते नक्कीच व्यसनांपासून दूर राहतील. यावेळी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी सांगितले. पूर्वीच्या नियमाप्रमाणे दारूचे दुकाने आणि परमिट बार हे रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर असली पाहिजेत. चित्रपटांमध्ये धूम्रपान आणि दारू दाखवता कामा नये तसेच टीव्हीवर सोड्याच्या जाहिराती निमित्त दारूची जाहिरात केली जाते ते त्वरित बंद झाले पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले.