एलसीबीची जळगाव शहरातील पिंप्राळ्यात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी गजाआड केली असून दोन जणांना जेरबंद केले आहे. त्यांनी जळगाव शहरात गुन्हे केले असल्याचे कबूल केले आहे. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जळगांव शहरात दुचाकी चोरणारे याचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधिक्षक माहेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी स्थनिक गुन्हे शाखेस सुचना दिल्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पथक तयार केले होते. सदर पथकातील पो.उपनिरी. दत्तात्रय पोटे, सफौ रवि नरवाडे, सफौ संजय हिवरकर, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहेकॉ मुरलीधर धनगर, पोहेकॉ/हरीलाल पाटील, पो.ना.प्रविण भालेराव याना दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. (केसीएन)त्या अनुषंगाने दि. १ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगांव शहरात शोएब अफजलखान पठाण (वय २३, रा. खूबचंद साहित्या कॉमप्लेक्स् हुडको पिप्राळा ता.जि. जळगांव) व शेख आवेश शेख मोहम्मद (वय २१ रा. आझाद नगर, पिप्राळा हुडको) हे मोटार सायकल चोरी करीत असल्याबाबत माहिती मिळाली.
त्याचा शोध घेत असताना पिप्राळा हुडको भागात ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्हेचे अनषंगाने चौकशी केली असता त्यानी गुन्हाची कबुली दिली. शोएब अफजलखान पठाण याने जळगांव शहारात कोर्ट चौकातुन जुपीटर कंपनीची मोटार सायकल तसेच सुभाष चौक जळगांव येथुन एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटार सायकल तसेच मेहरूण चौकातील बजाज कंपनीची प्लॉटीना मोटार सायकल तसेच खोटेनगर भागातुन एका घरातुन दिवसा सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा मोबाईल चोरी केलीबाबत कबुली दिली आहे. (केसीएन) चोरी केलेली २ दुचाकी व मोबाईल शेख आवेश याला विक्री केले बाबत कबुली दिली आहे. एक मोटार सायकल अल्तमेश शे. सलीम (रा. पिप्राळा हुडको) याला विक्री केले बाबत तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे २ मोटार सायकल व १ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.