पाचोरा ( प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आले. त्यात संजिदा बानो शेख दादामिया ही पदव्युत्तर इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी सुवर्णपदक पटकावून विद्यापीठात प्रथम आली. युगंधरा राजेंद्रसिंग परदेशी ही देखील पदव्युत्तर इंग्रजी विभागातून विद्यापीठात दुसरी आली.
तर कौस्तुभ राजेंद्रसिंग परदेशी हा साहित्य शाखेचा विद्यार्थी पदवी इंग्रजी विषयात तिसरा आला. नान्सी विकेश पूरसनानी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी विद्यापीठात चौथी आली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश एस. देशमुख, व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक वासुदेव महाजन, रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. शरद पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल संस्था व महाविद्यालय परिवारातील प्राध्यापक, कार्यालयीन अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.