भडगाव शहरात चाळीसगाव चौफुलीवर समाज बांधव रस्त्यावर
भडगाव (प्रतिनिधी) : धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी दि. ३० रोजी दुपारी १२. ३० वाजता भडगाव येथील पारोळा चाळीसगाव चौफुलीवर एकलव्य संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे रास्ता रोको आंदोलन एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या आदेशाने तर संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
हे आंदोलन तब्बल दिड तास चालले. रस्त्यावर वाहनांचा चक्का जिम झाल्याने वाहतुक काही वेळ खोळंबल्याचे दिसुन आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परीसर दणाणला होता. यावेळी एकलव्य संघटनेमार्फत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना तसेच तहसिल प्रशासनास निवेदन देण्यात आले.
भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, धनगर समाज हा धनगड हया जमातीच्या नावाचा गैर फायदा घेत गेल्या अनेक वर्षापासुन वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, उपोषण करुन धनगर समाजाला आदिवाशी मध्ये समाविष्ट करण्यात यावे. असे असविधानिक मागणी करीत आहेत. गेल्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असलेल्या याचीकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात आहे. व धनगड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचीका फेटाळुन लावली आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.
आंदोलन स्थळी एकलव्य संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष जळगाव रविंद्र शांताराम सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख विजय वसंत गायकवाड, भडगाव तालुकाध्यक्ष दशरथ रामा मोरे, शहराध्यक्ष विनोद पांडुरंग मोरे, युवा तालुकाध्यक्ष किरण मोरे, सचीव बाळु विठ्ठल सोनवणे, तालुका सल्लागार अंकुश मोरे, सदस्य भुरा गायकवाड, सदस्य अनिल शिवाजी ठाकरे, सदस्य किरण देविदास निकम, गोकुळ देविदास निकम, पिंटु वाघ शाखाध्यक्ष वढधे तसेच शिवदास सोनवणे कोळगाव, आत्माराम ठाकरे, हिरामण सोनवणे पथराड, मिथुन गायकवाड वडजी, नाना मालचे आडळसे, रविंद्र मालचे कजगाव, बाळु सोनवणे, नाना पवार कजगाव, रवि मोरे पेठ यांचेसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष रविंद्र सोनवणे यांचेसह पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आंदोलनस्थळी संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव, महिला, तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्त चोख लावण्यात आला होता.