• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

म्हसावद ते नागदुली लाईनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन, जळगाव तालुक्यातील १९ गावांना लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in खान्देश, जळगाव
0
म्हसावद ते नागदुली लाईनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन, जळगाव तालुक्यातील १९ गावांना लाभ

घरगुती, शेतीपंप ग्राहकांना अखंडित विद्युत पुरवठा मिळणार

जळगाव (प्रतिनिधी) : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२ के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने वीज पुरवठा होणार आहे. उद्योगधंदे यांच्या विद्युतीकरणाचा प्रश्न या शिरसोली उपकेंद्रामुळे सुटणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

सुरुवातीला जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील ३३/११ के. व्हीं उपकेंद्र येथे जिल्हा नियोजन व विकास समिती (डी.पी.डी.सी) अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. नागदूली ते म्हसावद ह्या उच्चदाब वाहिनीचे कामाचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वीज उपकेंद्रात करण्यात आले. या प्रसंगी अजय भोई यांची एस. आर. पी. कॉन्स्टेबलपदी नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. म्हसावद उपकेंद्र अंतर्गत म्हसावद व वावडदा परिसरातील १९ गावातील सर्व घरगुती व शेतीपंप ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळणार असून सदर कामाचा फायदा म्हसावद, बोरनार, लमांजन , वाकडी, कुऱ्हाडदे, डोमगाव, पाथरी ,वडली, वावडदा, रामदेववाडी व इतर गाव तसेच तांड्यांना फायदा होईल. सदर उच्च दाब वाहिनी अंदाजे ५ किमी असून १ कोटी २५ लक्ष रुपये निधी मंजूर झालेला आहे सदर काम ३ महिन्याच्या आत पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी नागदेवी ते म्हसावद येथे डीपीडीसी अंतर्ग तमंजूर असलेल्या ३३ केव्ही लिंक लाईन बाबत सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन माजी उपसरपंच शितलताई चिंचोरे यांनी केले तर आभार उपअभियंता विजय कपुरे यांनी मानले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, अति.कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन, उप अभियंता विजय कपुरे, शाखा अभियंता आव्हाड, माजी सभापती नंदलाल पाटील, समाधान चिंचोरे, सरपंच गोविंदा पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, निलेश पाटील, शिवराज पाटील, नारायण चव्हाण, उपसरपंच संजय मोरे, माजी उपसरपंच शितलताई चिंचोरे, ग्रा.पं. सदस्य आबा चिंचोरे, हौसीलाल भोई, महेंद्र राजपूत, प्रमोद खोपडे, बापू धनगर, इंदल भोई, अखिल पटेल, अनिल कोळी, धोंडू जगताप, रवी कापडणे, साहेबराव वराडे, सुनील बडगुजर, सुनील मराठे, परिसरातील सरपंच विश्वनाथ मंडपे, विनोद पाटील, अर्जुन शिरसाठ, बापू थोरात, धैर्यसिंग राजपूत, गोरख पाटील, भगवान चव्हाण, यांच्यासह परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

रस्ता ओलांडताना सुरक्षारक्षकाचा भरधाव बसच्या धडकेत मृत्यू

Next Post

हॉटेलच्या खोलीत भोपाळ येथील व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हॉटेलच्या खोलीत भोपाळ येथील व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

हॉटेलच्या खोलीत भोपाळ येथील व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon