जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : सुरक्षेसाठी शाळेत लावण्यात आलेले ५ सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी चोरून नेले. ही चोरी २५ सप्टेंबरला मध्यरात्री कानळदा येथील आदर्श विद्यालयात झाली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कानळदा येथील आदर्श विद्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांपैकी खालील व्हरांड्यातील दोन, वरील व्हराड्यांतील दोन व विज्ञान हॉलमधील एक असे एकूण पाच सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी चोरून नेले. दुसऱ्या दिवशी दिनांक २६ सप्टेंबर रोजी हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्राचार्य रवींद्र पाटील (५६) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहेत.