भडगाव तालुक्यातील शिंदी येथील घटना
भडगांव (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या कोळगाव येथील रहिवासी काशीनाथ संतोष महाजन यांची शेती शिंदी शिवारात असून त्यांच्या शेतातील शेडमध्ये दि. २५ रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला. त्या ठिकाणी बांधलेल्या तीन वर्षाच्या गाईच्या वासरीवर बिबट्याने हल्ला करून तिला जागेवरच ठार केले. यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
घटनास्थळी वन कर्मचारी अशोक पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनी पाहणी करून पाहणी व पंचनामा केला आहे. परिसर गिरणा खोऱ्यात असल्याने बागायत व फळ बागायत असून त्यात खरिपाचे पिके देखील फार मोठी झाल्याने बिबट्याचा परिसरातील गुढे, कोळगाव, पथराड, सावदे, नावरे, वाडे आदी शिवारात वावर वाढला आहे.