• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“अनुकंपा”वर लागू नये म्हणून काढला भावजयीचा प्रियकराच्या मदतीने काटा..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
“अनुकंपा”वर लागू नये म्हणून काढला भावजयीचा प्रियकराच्या मदतीने काटा..!

अमळनेर येथील खुनाचा छडा, नणंदेसह दोघांना अटक

एलसीबीसह अमळनेर पोलिसांना तपासात यश

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर शहरात गांधलीपुरा भागात रविवारी झालेल्या अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे तपास केला आहे. नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर सासूच्या जागेवर सून लागू नये, तिच्या जागी आपणच लागावे म्हणून सुनेच्या नणंदेनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

शितल जय घोगले (वय ३५, रा. मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या पती, सासू यांच्यासह राहत होत्या. रविवारी दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान मेहतर कॉलनी समोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शितल घोगले यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवली होती. मिळालेल्या गोपनीय माहिती व पुराव्याच्या आधारे त्यांनी मयत शितल घोगले हिची नणंद व तिचा प्रियकर यांना अटक केली.

तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. मयत शितल घोगले यांची सासू पारोबाई परशुराम घोगले (वय ५५) या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा जय हा आजारी असतो. म्हणून पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शितल लागेल. तिच्या ऐवजी मुलगी म्हणून आपणच लागले पाहिजे असा विचार शितल घोगले यांच्या नणंदेचा तथा पारूबाई यांची मुलगी मंगला हिचा होता.(केसीएन)त्यातूनच हे हत्याकांड घडले. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शितल आणि मंगलाबाई या दोघी शौचासाठी काटेरी झुडपात गेल्या होत्या. नंतर मुलगी मंगला ही परतली मात्र शीतल ही दिसून आली नाही. म्हणून शोधाशोध सुरू झाल्यानंतर काटेरी झुडपात शितल ही मृत अवस्थेत आढळून आली.

पोलिसांना तपासामध्ये मंगला हिने मी शौचाहून पाच मिनिटातच परत आली असे सांगितले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ती तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली आहे. तसेच तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळताच तिला विचारले, मी त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही असे तिने सांगितले. मात्र सीडीआर रिपोर्ट तपासला असता ती वारंवार आणि रात्री देखील तिचा प्रियकर याचेशी बोलताना दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संशयित आरोपी मंगला घोगले हिच्यासह तिचा प्रियकर करण मोहन घटायडे (वय ३४, रा. आयोध्या नगर, बंगाली फाईल) याच्या मदतीने नणंद मंगल हिने भावजय शितलचा गळा दाबून, दगडाने डोक्यावर, हातावर व गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय दत्तात्रय पोटे,अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे तपास पूर्ण केला आहे.


 

 

Previous Post

पुणे, साताऱ्याच्या गुन्हेगारांकडून ७ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस जप्त

Next Post

जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात
1xbet russia

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  
1xbet russia

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी
1xbet russia

रात्रभर पोलिसांकडून २१३ हॉटेल्स , ढाब्यांची अचानक तपासणी

May 3, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये घरफोडी: ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

May 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

महावितरणचा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा थाटात

May 3, 2026
भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

भुसावळ विभागात एप्रिलमध्ये  १ लाख ९ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून  १२.२३ कोटीं रुपयांच्या दंडाची वसुली  

May 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon